

श्रीसिद्धिविनायक मल्टीस्टेटची सर्वसाधारण सभा उत्साहात, सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर
धाराशिव – श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दि 27 रोजी परिमल मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरण पार पडली. या सभेत सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. या सभेला संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अभय शहापूरक, यशदा मल्टिस्टेटचे चेअरमन सुधीर सस्ते, मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंत मडके, सहकार अधिकारी…

जिल्हा शासकीय नोकर व उपनौकाराची मौजमस्ती; शेतकरी संतप्त, पोलीस नोकराचाही उर्मटपणा
धाराशिव- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सततच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. उडीद, मूग, तूरी, ऊस अशी पिके मोठ्या प्रमाणात पाण्यात गेली असून तब्बल ४.५ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. कोट्यवधी रुपयांचे सोयाबीन वाहून गेले. पिकांसह शेतातील मातीही नदीत कोसळली. नागरिकांच्या घरात पाणी घुसले; एवढेच नव्हे तर माणसांसोबत मुक्या जनावरांनाही जीव गमवावा लागला….

लोकसेवकाचा सही न केलेला माफीनामा, शेतकऱ्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न
धाराशिव – जिल्हाधिकारी व निवासी उप जिल्हाधिकारी यांचा सोशल मीडियावर नाच करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रेस नोट काढण्यात आली प्रशासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत दिलगिरी व्यक्त करणारी एक प्रेस नोट जाहीर केली. मात्र या प्रेस नोटमुळेच नवीन वादळ उठले आहे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची यात सही नाही. ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची एव्हाना ज्या…

श्री सिद्धिविनायक परिवारातील दोन्ही कारखान्यांच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य, पारदर्शक कारभारासह हंगाम 2024/25 चा अंतिम 200 रुपयांचा हफ्ता देण्याची घोषणा धाराशिव – श्री सिद्धिविनायक परिवारातील तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्रमांक 1 व खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्रमांक 2 या दोन्ही गुळ कारखान्यांच्या गळीत हंगाम 2025-26 या वर्षी उत्साहात प्रारंभ झाला. रविवार, दि. 10 रोजी या…

जिल्ह्यात ग्रीन एनर्जी प्रकल्पांच्या स्थापनेलाही मोठे प्रोत्साहन
धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये अनेकविध विकास प्रकल्प मोठ्या वेगाने राबवले जात आहेत. यात प्रामुख्याने सिंचन, ऊर्जा, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रांचा उल्लेखनीय समावेश आहे. जिल्ह्यात ग्रीन एनर्जी प्रकल्पांच्या स्थापनेलाही मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे स्वच्छ ऊर्जा निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. जिल्ह्यात वीज वापर वाढवण्यासाठी ऊर्जा क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. पर्यटन…

श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनच्या बुद्धीमंथन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
१८० खेळाडूंचा सहभाग, ३० हजारांचे रोख पारितोषिक वाटप धाराशिव – जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनच्यावतीने आयोजित ‘जि. एच. रायसोनी चषक २०२५ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २० जुलै रोजी शहरातील श्री सिद्धिविनायक परिवार हॉल, छत्रपती संभाजी महाराज नगर येथे उत्साहात पार पडली. धाराशिव जिल्हा बुद्धिबळ संघटना, जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अॅण्ड कल्चर फाउंडेशन आणि कल्पना…

संतापजनक! ब्रह्मदेवाची मूर्ती दुभंगली,हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मंदिराचे सुशोभीकरण नको,संवर्धन हवे…
तुळजाभवानी मंदिरातील उपदेवता मूर्ती हटवल्या… धाराशिव – श्रीतुळजाभवानी मंदिरात विकास आराखड्याच्या नावाखाली उपदेवतांच्या प्राचीन मूर्ती हटविण्यात आल्या असून, त्यात ब्रह्मदेव मूर्ती दुभंगल्याची घटना घडल्याने धार्मिक वातावरण चिघळले आहे. हे केवळ मूर्तीचे नुकसान नाही, तर श्रद्धेवरचा थेट आघात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी व्यक्त केली आहे. मंदिर परिसरातून ब्रह्मदेव, महामुनी नारद, उजव्या सोंडेचा गणपती, नर्मदेश्वर,…

धाराशिवच्या डोंगररांगांवरून हरित ऊर्जेची नवी क्रांती
धाराशिव – स्वच्छ हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश ही धाराशिव जिल्ह्याची ओळख आहे. बालाघाट डोंगररांगांवर वसलेल्या धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक आणि नैसर्गिक बलस्थाने खऱ्या अर्थाने आता राष्ट्रीय पटलावर ठळकपणे येताना दिसत आहेत. बालाघाट डोंगररांगांच्या घाटमाथ्यावरून वाहणारे वारे या जिल्ह्याची कधीच न संपणारी ऊर्जा आहे. जिल्ह्याच्या विकासाला नवनवे आयाम देणारी अफाट ताकद आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या धाराशिव जिल्ह्याला…

सहकारातून स्वावलंबनाची दिशा, सहकार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे मार्गदर्शन
श्री.सिद्धीविनायक बँकेच्या जनरल बॉडीच्या मीटिंगला विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन धाराशिव- शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्रीसिद्धिविनायक परिवाराच्या वतीने सहकार सप्ताह दीन साजरा करण्यात आला या आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. संदीप देशमुख तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी होते. यावेळी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी सहकार या…

श्रीसिद्धीविनायक सोशल फाऊंडेशनचा सहकार सन्मान उपक्रम जबाबदारीच्या पलीकडचा संवाद
धाराशिव सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी परिसंवाद करून त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान मान्य करण्यात आले. हा सन्मान कार्यक्रम जिल्ह्यात सहकार मूल्यांची रुजवणूक आणि सहकारी…